पुणे, दि. 24 : पुणे विभागातील 8 लाख 96 हजार 807 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 10 लाख 62 हजार 601 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 45 हजार 483 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 20 हजार 311 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.91 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 84.40 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 7 लाख 63 हजार 194 रुग्णांपैकी 6 लाख 49 हजार 565 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 1 लाख 1 हजार 839 आहे. कोरोनाबाधित एकूण 11 हजार 790 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.54 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 85.11 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 88 हजार 250 रुग्णांपैकी 69 हजार 676 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 16 हजार 499 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 75 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 85 हजार 379 रुग्णांपैकी 71 हजार 81 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 11 हजार 849 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 449 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 65 हजार 557 रुग्णांपैकी 53 हजार 769 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 778 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 60 हजार 221 रुग्णांपैकी 52 हजार 716 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 518 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 987 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ-
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 15 हजार 210 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 9 हजार 841, सातारा जिल्ह्यात 1 हजार 816, सोलापूर जिल्ह्यात 1 हजार 468, सांगली जिल्ह्यात 1 हजार 264 तर कोल्हापूर जिल्ह्यात 821 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या एकूण 12 हजार 366 आहे. पुणे जिल्हयामध्ये 9 हजार 186, सातारा जिल्हयामध्ये 1 हजार 365, सोलापूर जिल्हयामध्ये 1 हजार 70, सांगली जिल्हयामध्ये 463 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 282 रुग्णांचा समावेश आहे.
विभागातील लसीकरण
विभागामध्ये 22 एप्रिल 2021 पर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्ह्यातील 19 लाख 13 हजार 251, सातारा – 5 लाख 4 हजार 947, सोलापूर- 2 लाख 88 हजार 410, सांगली- 4 लाख 34 हजार 229 व कोल्हापूर जिल्ह्यातील 3 लाख 58 हजार 52 नागरिकांचा समावेश आहे
विभागात कोरोना बाधित 10 लाख 62 हजार 601 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव