माघवारी मध्ये पंढरीत संत ज्ञानेश्र्वर महाराज पालखी सोलापूर व संत तुकाराम महाराज पालखी सोलापूर या पालखी पूजन ह भ प भागवत चवरे महाराज (पंढरपूर ) , सुधाकर दाइंगे नायब तहसिलदार , नाना कदम , राकेश अन्नम यांचे हस्ते करण्यात आले. शंकर भोसले , अभिमन्यू डोंगरे महाराज, दगडू डोंगरे यांच्या शुभ हस्ते अश्व पूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त मुर्ती पूजन तानाजी बेलेराव, विष्णुपंत मोरे महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर अश्व रिंगण सुरु झाले. पंढरपूरमध्ये प्रवेश करताना सर्व वारकरी भाविकांनी उत्साहात उभे रिंगण पुर्ण केले. वारकरी परंपरा खूप मोठी असून ती निष्ठेवर टिकून आहे.
” देह जावो अथवा राहो |
पांडूरंगी दृढ भावो ||”
या संत उक्तीप्रमाणे वारकरी भाविक वारी करतात. त्यामध्ये पारंपरिक पद्धतीने फुगडी खेळणे, पाऊल खेळणे, ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. त्यानुसार रिंगण सोहळा सुद्धा उत्साहात साजरा केला जातो. सर्व वारकरी पायी चालत पंढरीकडे येत असल्याने त्यांच्या शरीराला आलेला थकवा जाण्यासाठी रिंगण सोहळा केला जातो. या रिंगण सोहळातील ऊर्जा वाखणण्या सारखी असते. रिंगणातील अश्व धावताना वातावरण पुर्ण बदललेले असते. ” याची देही याचि डोळा | “
रिंगण सोहळा पाहून सर्व वारकरी आपापल्या पद्धतीने गजर करत दिंडीच्या माध्यमातुन मार्गस्थ झाले. अखिल भाविक वारकरी मंडळ पदाधिकारी या सोहळ्यासाठी परिश्रम घेत होते. जोतीराम चांगभले (प्रदेश अध्यक्ष), श्रीहरी वैद्य नाशिककर , किसन कापसे (प्रदेश उपाध्यक्ष) यांच्या उपस्थितीमध्ये व बाबा निळ (जिल्हा उपाध्यक्ष), संजय पवार (शहर अध्यक्ष), किरण श्रीचिप्पा (शहर सहअध्यक्ष), सचिन गायकवाड (शहर उपाध्यक्ष), निवृत्ती मोरे , यातिराज जाधव , ई. च्या प्रयत्नातून सोहळा पार पडला .