सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणात गेल्या आठ दिवसात तब्बल 32 टक्के पाणी आले आहे उजनी धरण मायनस 22 टक्के पर्यंत गेले होते शुक्रवारी शनिवारी सकाळी सहा वाजेपर्यंत या धरणात मायनस पातळी जाऊन तब्बल 13 टक्के पाणी वाढले आहे 123 पीएमसी क्षमता असलेल्या या धरणात सध्या 70 टीएमसी एवढे पाणी साधले आहे. दौंड मधून 52754 क्युसेक वेगाने उजनी धरणात पाणी मिसळत आहे. पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे उजनी झपाट्याने भरू लागली आहे त्यामुळे येत्या आठ दिवसात उजनी धरण 25 टक्क्यांपर्यंत जाईल दुसरीकडे वीर धरणातून नीरा नदीमध्ये 8020 एक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे हे पाणी नीरा नरसिंगपूर पासून भीमा नदीत मिसळते.