सोलापूर : आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेती मधील बैलजोड्या संपत चालल्या आहेत. तरीही काही ठिकाणी अजूनही शेतकऱ्यांच्या दारामध्ये बैल जोडी प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाते.सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वदूर असा दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या तालुक्यातील शिवारामध्ये पेरण्याची सुरू असलेली लगबग दिसते. दक्षिण सोलापूर तालुक्यातील डोणगाव मध्ये माजी आमदार रवी पाटील यांच्या शेतामध्ये तब्बल पाच बैलजोड्या द्वारे पेरणी सुरू आहे. तूर आणि उडीद यांची सुरू असलेली डोणगाव मधील ही पेरणी पहा कॅमेरामन विजय आवटे यांच्या अँगलमधून..