नुकत्याच झालेल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपाने घवघवीत यश मिळवले आहे, परंतु भाजपाला 3, काँग्रेसला 2, तर इस्लाम पार्टीला एका महानगरपालिकेमध्ये बहुमताचा जादुई आकडा गाठण्यात अपयश आले आहे. सांगली महानगरपालिकेतील एकूण 78 जागांपैकी भाजपाने 39 जागा जिंकले आहेत. बहुमतासाठी एक जागा कमी पडली आहे. काँग्रेस 18 जागा मिळवत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे.अमरावतीत 87 जागांपैकी 25 जागा मिळवत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून बहुमताचा 44 आकडा गाठण्यासाठी तो खूप लांब आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आमदार रवी राणांच्या युवा स्वाभिमानचे 16 नगरसेवक निवडून आले आहेत.
अकोलामध्ये देखील एकूण 80 जागांपैकी 38 जागा मिळवत भाजपा आघाडीवर असून बहुमतासाठी भाजपाला केवळ 3 जागा हव्या आहेत. 21 जागांसह काँग्रेस हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.भिवंडीतील एकूण 90 जागांपैकी काँग्रेसने 30 जागा मिळवत पहिला नंबर पटकावला आहे. बहुमतासाठी 46 हा जादुई आकडा असून 22 जागांसह भाजपा दुसऱ्या क्रमांकावर आहे.चंद्रपूरमध्ये देखील एकूण 66 जागांपैकी 27 जागा जिंकत काँग्रेस मोठा पक्ष ठरला आहे. बहुमताचा आकडा हा 34 असून 23 जागांसह भाजपा हा दुसऱ्या स्थानावर आहेमालेगाव मध्ये एकूण 84 जागांपैकी इस्लाम पक्षाने 35 जागा मिळवत मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. बहुमताचा आकडा 43 असून येथे दुसऱ्या क्रमांकावर 21 जागांसह एम आय एम विराजमान आहे.

