सोलापूर : सोलापूर शहरात नव्याने वाहतूक नियमांची दंड आकारणी रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झाली आहे. नागरिकांनी वाहतूक नियम पाळावेत, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे. वाहन चालवताना मोबाइलवर बोलल्यास ५०० रुपये दंड, वाहनांची फॅन्सी नंबर प्लेट एक हजार रुपये दंड आहे. याशिवाय १६ वर्षांखालील व्यक्तीने वाहन चालवल्यास पाच हजार रुपये दंड, वाहनाला एल बोर्ड नसल्यास पाचशे ते पंधराशे रुपये दंड. हेल्मेट नसल्यास वाहतूक परवाना लायसन्स तीन महिने निलंबित व ५०० दंड, विनाकारण हॉर्न वाजवणे किमान एक हजार ते दोन हजार दंड. नव्या नियमानुसार दंड आकारणी रविवारपासून सुरू झाली आहे. एकूण १९४ प्रकारच्या दंडांची नियमावली तयार करण्यात आली आहे. किमान पाचशे ते पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. या नव्या दंडाची आकारणी शहर व जिल्ह्यातही राहील.
- कुठल्या कलमाखाली किती दंड
- विना लायसन्स व मुदत संपली असेल तर (५ हजार),
- फॅन्सी नंबर प्लेट (एक हजार),
- मोबाइलवर बोलणे (पाचशे ते पंधराशे),
- नो एंट्रीमध्ये वाहन चालवणे (पाचशे ते पंधराशे),
- ट्रिपल सीट (एक हजार दंड आणि तीन महिने वाहन परवाना रद्द),
- वाहनांचा प्रखर प्रकाश पाडणे (पाचशे ते १५००),
- हॉर्न वाजवणे (१ ते २ हजार दंड),
- पोलिसांनी इशारा केल्यावर न थांबणे (पाचशे ते पंधराशे),
- वेगमर्यादा २/३/४ चाकी व अन्य वाहनांसाठी अनुक्रमे १, २, ४ हजार दंड, वाहनांना दोन्ही बाजूचा आरसा नाही,
- सायलेन्सर (मोठा आवाज) किमान पाचशे रुपये दंड,
- खासगी वाहने तीन, चारचाकीत बसवण्यासाठी प्रवाशांचे लक्ष वेधण्यासाठी ओरडणे (५०० दंड),
- वाहतूक अडथळा करून थांबणे (५००-१५००)असे एकूण महत्त्वाचे १९४ नियम आहेत.