सोलापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे उद्या बुधवारी सर्व खासदार आमदारांसह अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेणार आहेत ही बैठक दुपारी साडेबारा वाजता नियोजन भवनात होणार असून त्यामध्ये कोरोना रुग्ण वाढत असल्याने करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा होणार आहे या बैठकीत प्रामुख्याने भाजी मंडई व मार्केटमधील गर्दी कमी करण्यासाठी नियोजन प्रत्येक तालुक्यांमधील रुग्णांची स्थिती आणि आगामी निर्णय सार्वजनिक कार्यक्रम सभा आंदोलने विवाहासाठी 50 पेक्षा अधिक लोक असल्यास थेट गुन्हा दाखल करण्याचा निर्णय उपलब्ध करण्याबाबत विचारविनिमय होणार आहे.