सोलापूर : देशभरात कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळं IIT प्रवेश परीक्षा JEE अॅडव्हांस स्थगित करण्यात आली आहे. आता ही परीक्षा कधी घेतली जाईल याबाबत अद्याप कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. जेईई अॅडव्हांस 2021 परीक्षा 3 जुलै रोजी आयोजित करण्यात आली होती. ही प्रवेश परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. यंदा कोरोनामुळं जेईई मेन परीक्षा देखील घेण्यात आलेली नाही.
ऑफिशियल नोटिसीमध्ये सांगितलं आहे की, “कोविड-19 च्या कारणामुळं सध्याच्या महामारीच्या परिस्थितीला ध्यानात घेऊन JEE (अॅडव्हांस ) 2021 परीक्षा जी 03 जुलै, 2021 (शनिवारी) घेतली जाणार होती, ती स्थगित करण्यात आली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखेची घोषणा योग्य वेळी करण्यात येईल.”