GBS चा वाढता धोका पाहता राज्यातील यात्रांवर निर्बंध आणले जाऊ शकतात. लवकरच अधिकारी आणि प्रशासनाची बैठक घेऊन यावर निर्णय घेणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची केली. जर हा आजार संसर्गजन्य असल्याचं समोर आलं तर त्यावर कडक उपाययोजना केल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, “GBS हा आजार जर गर्दीमुळे होत असल्याचं किंवा संसर्गजन्य असल्याची माहिती मिळाली तर वैद्यकीय अधिकारी आणि प्रशासनाची बैठक घेऊन लवकरच राज्यातील यात्रांवर निर्बंध आणण्यात येईल. तसेच बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेल्या सैलानी यात्रेवरही निर्बंध आणण्याबाबत विचार सुरू आहे.”