येस न्युज मराठी नेटवर्क : २०१८ साली सुरू झालेल्या ‘मी टू’ या ऑनलाईन चळवळी दरम्यान पत्रकार प्रिया रमानी यांनी तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री एम जे अकबर यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. अकबर यांनी प्रिया रमानी यांच्याविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती. याच प्रकरणात निकाल देताना दिल्ली न्यायालयानं एम जे अकबर यांचे आरोप फेटाळताना प्रिया रमानी यांना मानहानी प्रकरणात दोषी ठरवण्यास नकार दिला. रमानी यांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात एकच गहजब उडाला होता. त्यामुळे १७ ऑक्टोबर २०१८ रोजी एम जे अकबर यांना आपल्या केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर १५ ऑक्टोबर २०१८ रोजी अकबर यांनी प्रिया रमानींविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला.