सोलापूर शहर कॉंग्रेस विडी व यंत्रमाग सेल कार्यालयाचा शुभारंभ
सोलापूर (२२ जुलै) – सोलापूर शहर विडी व यंत्रमाग सेलच्या अध्यक्षपदी लक्ष्मीनारायण दासरी यांची निवड करण्यात आली. जुना अक्कलकोट रोड गांधी नगर येथे त्यांच्या कार्यालयाचा शुभारंभ महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते तर शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी सुधीर खरटमल, वर्षा काळे, विजयश्री गायकवाड, अंबादास गुत्तीकोंडा, अशोक जैन, तिरुपती परकीपंडला, शिवा गायकवाड आदी उपस्थितीत होते.
यावेळी आमदार शिंदे म्हणाल्या, पूर्व भागात विडी कामगारांची संख्या खूप मोठी आहे. पूर्व भागात बहुतेक घरात महिलामुळे घरातील चूल पेटत असते. महिला अतिशय कष्ठाळू आहेत. पद्मशाली समाजात महिलांचा आदर केला जातो. घरात महिला सर्वेसर्वा असतात. ज्या ज्या वेळी विडी कामगारांना अडचणी आल्या. आम्ही प्रत्येक वेळी त्यांच्यासोबत उभे राहिलो आहे. त्यांचे रोजगार वाचविण्यासाठी, मजुरीवाढीसाठी, व इतर अडचणी सोडविण्यासाठी गल्ली ते दिल्ली पर्यंत आंदोलन केले आहे. जगण्यासाठी त्यांच्या संघर्ष चालू असते. विडी कामगारांच्या पाल्यासाठी शिक्षणासाठी सहकार्य, मोफत शिवणकाम, कॉम्पुटर प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत. विडी कामगार अक्का, चेल्लेलु (भगिनी) यांनी साथ दिल्यामुळेच मी तीन वेळा आमदार झाले हे मी कधीच विसरू शकणार नाही. आयुष्यभर त्यांचे ऋणी राहणार आहे. त्यांची सोबत शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही.
कॉंग्रेस पक्षाने विडी व यंत्रमाग सेलची जबाबदारी लक्ष्मीनारायण दासरी यांच्याकडे सोपविली असून त्यांना सामाजिक दृष्टीकोन असून तळमळीने विडी व यंत्रमाग कामगारांच्या अडचणी सोडविण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील, संघटना उभी करतील. असेही आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या.