सोलापूर – नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड जिल्हा शाखा सोलापूर संचलित स्वामी विवेकानंद शिक्षण संकुल एमआयडीसी सोलापूर व नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (NIMA) यांच्या संयुक्त विद्यमाने नॅब संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशजी यलगुलवार साहेब यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त स्वामी विवेकानंद शिक्षण संकुलामध्ये मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास डॉ. चंद्रकांत कुलकर्णी अध्यक्ष निमा अमृत महोत्सवी समिती, डॉ. रवी गायकवाड अध्यक्ष निमा सोलापूर, डॉ. अनिल पत्की राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य निमा, डॉ. साहेबराव गायकवाड प्राचार्य वैराग आयुर्वेद महाविद्यालय, डॉ. ग्यानानंद शिंदे, डॉ. बोगर्गे तसेच नॅब संस्थेचे सहसचिव शशीभूषण यलगुलवार सर, नॅब संस्थेचे आजीव सदस्य माणिक यादव सर उपस्थित होते. प्रारंभी प्रमुख अतिथी व अध्यक्ष यांच्या शुभहस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुभाष माने सर यांनी केले. प्रमुख अतिथी डॉ. कुलकर्णी, डॉ. गायकवाड, व संस्थेचे सहसचिव शशीभूषण यलगुलवार, माणिक यादव सर यांनी आपल्या मनोगतामध्ये आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी मत मांडले. या कार्यक्रमांमध्ये परिसरातील महिला पुरुष या सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या आरोग्य शिबिरामध्ये शुगर, बीपी, सर्दी, खोकला, पोटदुखी व इतर आजारांचे मोफत तपासणी करून मोफत औषधे देण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सीमा यलगुलवार यांचे मार्गदर्शनानुसार करण्यात आले. हे आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका ताटे मॅडम, सपताळे सर, राठोड सर, कोळी सर, शिंदे सर, हिंगमिरे मॅडम, सुतार मॅडम, बनसोडे मॅडम, मानसी मॅडम, राऊतराव सर, कांचन मॅडम यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष माने सर यांनी केले व कार्यक्रमाचे आभार ताटे मॅडम यांनी मानले.