अक्कलकोट : अक्कलकोट मतदारसंघातील जेऊरवाडी येथे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची प्रचार बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कल्याणशेट्टी यांनी बैठकीला उपस्थित राहून गावकऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली तसेच भाजप-महायुतीचा उमेदवार म्हणून मतदानरूपी आशीर्वाद मागितला. गेल्या 5 वर्षांतील तालुक्याच्या आणि गावाच्या विकासाच्या जोरावर पुन्हा मला लोकप्रतिनिधी म्हणून पाठवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

याप्रसंगी श्री. विलास गव्हाणे, महिबुब मुल्ला, विलास राठोड, कमलाबाई राठोड, सुभाष चव्हाण, संजय राठोड, संदीप राठोड, देविदास राठोड, टोपू महाराज, शिवलाल राठोड, गुणाबाई चव्हाण, रामेश्वर राठोड आदीसह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.