सोलापूर : मागील काही दिवसांपासून पारा घसरल्यामुळे हुडहुडी वाढली आहे. सध्या थंडी वाढलेली असल्यामुळे उबदार पकडे घालण्याकडे कल वाढलाय. मात्र या कडाक्याच्या थंडीमध्ये राज्यातील खान्देश आणि विदर्भात सरी बरसरण्याची शक्यता आहे. तसा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. येत्या सहा जानेवारीपासून उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे.
सध्या वातावरणातील गारवा वाढला आहे. मात्र आगामी काही दिवसांत वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात पुढील चार दिवस थंडीमध्ये कोणताही बदल होणार नाही. म्हणजेच आगामी चार दिवस सध्याची हुडहुडी कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात सकाळी धुके, तसेच अंधुकसा प्रकाश अशी स्थिती राहील.