आजपासून १२वी बोर्डाच्या लेखी परीक्षेला सुरुवात होत आहे. २१ मार्चपर्यंत ही परीक्षा पार पडणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी हजर रहावं लागणार आहे. तर विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी 10 मिनिटांचा वेळ वाढवून देण्यात आला आहेत. यंदा तब्बल १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात.