येस न्युज नेटवर्क : जगभरात आपल्या भविष्यवाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या बाबा वेंगा पुन्हा चर्चेत आहेत. जगाचा निरोप घेऊन जवळपास तीन दशके झाली तरी त्यांनी केलेली भाकितं आजही जगात चर्चेत असतात. बाबा वेंगा यांनी काही वर्षांपूर्वी अमेरिकेवर 9/11चा हल्ला आणि ब्रिटनमधील ब्रेक्झिटची भविष्यवाणी केली होती. 2024 साठी बाबा वेंगाने केलेली भविष्यवाणी भीतीदायक आहे.
रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्न
पुढच्या वर्षी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची त्यांच्याच देशातील कोणीतरी हत्या करेल, अशी भविष्यवाणी बाबा वेंगा यांनी केलीय.
युरोपात दहशतवादी हल्ले वाढतील
पुढच्या वर्षभरात एखादा मोठा देश जैविक अस्त्रांची चाचणी किंवा हल्ला करेल, अशी भविष्यवाणी बाबा वेंगाने केली आहे. युरोपमध्ये दहशतवादी हल्ले करतील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.
आर्थिक संकट येईल
पुढच्या वर्षी मोठे आर्थिक संकट येणार असून त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होणार आहे. आर्थिक संकटाची कारणेही उघड केली आहेत. कर्जात वाढ आणि भू-राजकीय तणावामुळे आर्थिक संकट येईल, असंही भाकित वर्तवलं आहे.
सायबर हल्ले वाढतील
येत्या वर्षात जगभरात सायबर हल्ले वाढतीत. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
कॅन्सरवर उपचार मिळेल
बाबा वेंगाने केलेल्या भविष्यवाणीत वैद्यकीय क्षेत्रातून सकारात्मक अंदाज समोर येत आहे. अल्झायमरसारख्या असाध्य आजारांवर नवीन उपचार उपलब्ध होणार असल्याचे सांगितले आहे. 2024 मध्ये कॅन्सरवर इलाज सापडेल असेही त्यांनी भाकित वर्तवलं म्हणाले.