बसव सेंटर सोलापूर या संस्थेच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वर व बसव कालीन शरण आणि शरणी यांच्या बसव साहित्याचा व वचन साहित्याचा विविध उपक्रमाव्दारे प्रचार व प्रसार करण्याचे कार्य गेल्या ४४ वर्षा पासून हे काम निरंतर चालू आहे. या संस्थेचे उद्दिष्ट महात्मा बसवेश्वर यांचे विचार तळागाळातील लोकांना अवगत करुन अनुचीत चालीरिती, परंपरा पासून मुक्त करणे व चांगल्या डोळस विचाराची समाजामध्ये पेरणी करणे हा आहे.
तसेच सेंटरच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वर व बसवकालीन शरण शरणीची जयंती साजरी करणे, विद्यार्थी दशेतील तरुणांना व तरुणींना वचन पाठांतर व तसेच निबंध स्पर्धेच्या माध्यमातून या महापुरुषाचे चरित्र्य व कार्याची माहिती आवगत करुन देणे. त्याच प्रमाणे विविध विषयावरील सामाजिक प्रश्नावर बसवेश्वराच्या मुळ तत्वाला अनुषंगाने मान्यवरांचे व्याख्यान आयोजित करणे.
या व्यतिरिक्त समाजामध्ये ज्या गुणी जनानी समाजातील तळागळातील गरजवंताना, उपेक्षितांना, निराधारांना मदत करुन उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा मानद पदवी देवून सन्मानीत करणे हा उपक्रम या संस्थेकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्याचाच भाग म्हणून रविवार दिनांक ४ मे २०२५ रोजी सायंकाळी ०६.०० वाजता लोकमान्य टिळक सभागृह अॅम्फि थिएटर, किल्ला रोड, सोलापूर या ठिकाणी संपन्न होत आहे. या वर्षाचे मानकरी ज्यांना मानद पदवी देवून सन्मानीत करण्यात येत आहे ते खालील प्रमाणे.
१) प्रा. डॉ. गुरुलिंगप्पा धबाले
बसवभुषण
कन्नड, खेडी विदर्भ, अक्कलकोट.
२) श्री श्रीकांत मोरे
बसवरत्न
ज्येष्ठ साहित्यिक, चेअरमन-मनोरमा बँक परिवार
३) श्री राजशेखर विजापुरे
बसव श्री
संस्थापक अध्यक्ष-वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान
४) श्री सिध्देशवर फौंडेशन
आदर्श संस्था
संस्थापक अध्यक्ष- श्री सिध्दार्थ सर्जे