हुरड्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्यात प्रथमच होमिओपॅथिक आणि सेंद्रिय औषधे व खते वापरून पिकवलेल्या ज्वारीचा हुरडा महोत्सव आयोजित केला आहे. जुलै सोलापुरातील इंडियन मॉडेल स्कूलच्या शेजारी असलेल्या टी पोस्ट येथे हुरडा तसेच मिलेट्स ड्रायफ्रूट्स आणि केमिकल मुक्त धान्य पुरवठा साठी हे सेंटर सुरू करण्यात आले आहे अशी माहिती सिद्धेश्वर जोकारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोलापूरकरांना केमिकल मुक्त धान्य व भाजीपाला मिळावा या हेतूने बारामती कृषी विज्ञान केंद्र आणि सोलापूर कृषी विज्ञान केंद्र येथील अधिकाऱ्यांच्या सहकार्याने कल्ट नट्स एन मिलेट्स हे सेंटर देखील सुरू करण्यात आले आहे. गेल्या चार वर्षात होमिओपॅथी खते आणि औषधांचा वापर करून आंबा, डाळिंब, मिरची, हुरडा आणि ज्वारी या पिकांचे उत्पादन आम्ही घेत आहोत. तसेच सोलापुरातील लोकांना घरबसल्या शेतीमाल, ड्रायफ्रूट्स, फुलांची बुके, मिलेट्स, केक याची विक्री करण्यासाठी एक कल्ट नट्स एन मिलेट्स य या नावाचे मोबाईल ॲप्लिकेशन देखील तयार केले आहे. संक्रातीनंतर हे मोबाईल ॲप्लिकेशन सुरू होणार आहे. या अगोदर आयोजित केलेल्या आंबा महोत्सवाला ज्याप्रमाणे चांगला प्रतिसाद मिळाला त्याचप्रमाणे सोलापूरकरांनी या होमिओपॅथिक ऑरगॅनिक हुरडा महोत्सवाला प्रतिसाद द्यावा असे आवाहन जोकर यांनी केली आहे