सोलापूर : भावसार समाजाची कुलदेवता श्री हिंगलाज माताचा प्रकट दिन फाल्गुन वद्य त्रयोदशीला म्हणजेच आज 9 एप्रिल 2021 ला मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मात्र कोरोनाच्या सावट असल्यामुळे सोलापूर येथील मंगळवार पेठ येथील हिंगुलांबीका मंदिर येथे सकाळी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत देवीला अभिषेक करण्यात आला त्यानंतर आरती करण्यात आली . कोरोना मुळे मंदिर बंद असल्याने भावसार देवालय तर्फे देवीच्या गाभाराचे 24 तास live प्रक्षेपण चालू आहे.
शासनाच्या निर्बध मुळे कोणताही मोठा कार्यक्रम मंदिरात न करता हा उत्सव भावसार लोकांच्या घराघरात आरती व माता ची आराधना करून संध्याकाळी घरासमोर आकर्षक रांगोळी काढून त्यावर पाच दिवे लावून हिंगलाज देवीची उपासना करावी असे आवाहन युनायटेड भावसार ऑर्गनिसशनचे अध्यक्ष अश्विन डोईजोडे यांनी केलेले आहे.
