बघता बघता आज सायकलिंग चे दोनशे दिवस पुर्ण झाले
सोलापूर : खर तर सुरवातीला अगदी टाईमपास म्हणून सुरु केलेले सायकलिंग आज व्यसन बनले…मागे वळून पाहताना…तसे तर मागे पाच ते सहा वेळा जिम ला पैसे भरुन न जाणे हा अनुभव माझ्यासाठी नविन नव्हता म्हणून पैसे घालून नविन सायकल घेण्याची डेरींग होत नव्हती पर्यायी डोंगरेश चाबुकस्वार ची जुनी सायकल रिपेअर करुन घेतली आणि सलग तीन महिने सराव झाल्यानंतर लाॅकडाऊन मध्ये चहापाण्याच्या वाचलेल्या पैशातून नविन सायकल घेतली आणि तो प्रवास आज दोनशे दिवसांवर पोहचला.
ह्या दोनशे दिवसांमध्ये ५,२६४ किमी इतके अंतर सायकलिंग केले कधी दररोज तर कधी संडे सायकल राईड असे करत करत आज दोनशे दिवस पुर्ण केले अगदी सुरवातीला ५,१०,१५,२०,३० नंतर ५०,१०० किमी अंतर सहज पार करत गेलो. आज माझा माझ्यावरच विश्वास बसत नाही पण शेवट पर्यंत सातत्य टिकवणे हे ध्येय ठेवलं होत आणि आता भविष्यात ही राहील. आज दोनशव्या राईड निमित्त लांबोटी येथे जाऊन एकुण ५८ किमी सायकलिंग केले व सेलिब्रेशन देखील केले सोबत महेश बिराजदार, डॉ प्रविण ननवरे, भावेश शहा, दादाराव इंगळे, प्रविण जवळकर, आनंद कोल्हापूरे, प्रदीप कदम, शिवाजी सुरवसे, बालाजी सुरवसे, प्रतापराव भोसले, डॉ हर्षवर्धन जोशी व सुनिल पवार आदी सहकारी उपस्थित होते.
ह्या एकुण प्रवासामध्ये डॉ. अभिजीत वाघचवरे, डाॅ सत्यजित वाघचवरे, महेश बिराजदार, डॉ प्रविण ननवरे, अविनाश देवडकर, अमेय केत, आदित्य बालगावकर, प्रा. सारंग तारे, भाऊराव भोसले, शितल कोठारी व अनिकेत चनशेट्टी यांची मोलाची साथ लाभली. मधल्या काळातील विशेष आठवण म्हणजे माझा मित्र शिवराज केल्लुरकर यांनी नविन सायकल टी शर्ट भेट दिला व सोलापुरातील Yes News Marathi च्या विशेषांकामध्ये माझा सायकलिंग वरचा लेख प्रसिद्ध झाला.
आज दोनशव्या राईड च्या निमित्ताने सोबत असणाऱ्या व सायकल लव्हर्स च्या सर्व सदस्यांचे सहकार्याबद्दल मनपूर्वक आभार.
- हिंदुराव दिनकरराव गोरे