अक्कलकोट : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव येथील जागृत मारुतीचे दर्शन घेतले. दर्शन घेऊन मन तृप्त झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
मंत्री पाटील सहपरिवार गौडगाव येथे दर्शनासाठी आले होते. मंदिर समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. २२ मार्च रोजी माझ्याकडून महाप्रसाद देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. गौडगाव मारुती मंदिरात शनिवारी स्वामी समर्थ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात ७५० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. मधुमेह तज्ञ डॉ. योगेश वेळापूरकर व बालरोग तज्ञ डॉ अमृता कोटे गणेश माने हे उपस्थित होते. आजचा महाप्रसाद खजुरी येथील संजयकुमार पंडित बंडे यांच्याकडून देण्यात आला आहे. दुपारच्या महाआतीचा मान मणुर येथील भक्त मल्लिकार्जुन गडेप्पा पुजारी यांना मिळाला. यावेळी कोषाध्यक्ष सिद्राम वाघमोडे, सचिव प्रकाश मेंथे, माजी सरपंच वीरभद्र सलगरे, शंकर पाटील, ज्ञानेश्वर फुलारी आमशिद्ध कोरे, चौडप्पा सोलापुरे, परमेश्वर सुतार, प्रकाश सनकळ आदी उपस्थित होते.
