श्रीनगर : सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत देशातील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असणाऱ्या एका मोठ्या दहशदवाद्याला ठार करण्यात भारतीय सैन्याला यश आले आहे. उत्तर काश्मीरच्या हंदवाडा येथे चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनच्या अतिरेकी संघटनेचा सर्वात जुना आणि सर्वोच्च कमांडर असलेला मेहराजउद्दीन हलवाई उर्फ उबैद याला सुरक्षा दलांनी ठार केले आहे. हा मेहराजउद्दीन अनेक दहशतवादी घटनांमध्ये सामील असल्याची माहिती काश्मीरच्या पोलीस महानिरीक्षकांनी दिली.