येस न्युज मराठी नेटवर्क : मुंबईही कर्नाटकचा भाग आहे, असं वक्तव्य करणाऱ्या कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जहरी टीका केली आहे. असे येडे बरळत असतात, कर्नाटकचा प्रश्न हा केवळ कर्नाटकचा नसून, हा दोन राज्यांतील सीमा प्रश्न आहे.
हे कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना कळालं पाहीजे. त्यांनी थोडा इतिहास समजून घेतला पाहिजे, असा टोला राऊतांनी लगावला आहे.कर्नाटकचा प्रश्न हा केवळ कर्नाटकचा नसून, हा दोन राज्यांतील सीमा प्रश्न आहे. हे कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना कळालं पाहिजे. कायद्याने काय व्हायचे ते होईलचं, पण आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे आहेत, हे सुद्धा कर्नाटक सरकारने विसरु नये. कोणी तिकडे काही बरळलं तरी आम्हाला फर पडत नाही, अशा शब्दांत राऊतांनी कर्नाटक सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.