राज्यभरातील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यांच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. राज्यातील काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरूवात झाली आहे.
एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये जमा होईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यानुसार काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरूवात झाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. तर, ज्या लाडक्या बहिणींना पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे एकूण 12000 रुपये मिळतात त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून दरमहा 500 रुपये दिले जाणार आहेत.