मुंबई – मुंबईसह उपनगरात बुधवारी रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. गुरुवारी सकाळीपासून मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस सुरू झाला. १९ जून रोजी, गुरुवारी राज्यात मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यातील आतापर्यंत चांगला पाऊस पडला असल्याची माहिती देण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, उत्तर-पूर्व भागात गेल्या २४ तासांत सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडला.
राज्यात पावसाची स्थिती
कोकणात सामान्यपेक्षा जास्त पाऊस झाला आहे, तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात आतापर्यंत सामान्य पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रात मे महिन्यात मेघगर्जनेसह अंतर्गत भागात चांगला पाऊस झाला. विदर्भात अद्याप चांगला पाऊस व्हायचा आहे.