सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील २१ तक्रारीवर सुनावणी
सोलापूर, दिनांक 20 – महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील प्रलंबित तक्रारींच्या सुनावणीबाबत नियोजन भवन, सोलापूर येथे सुनावणी व आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
सदर सुनावणी व आढावा बैठीत सोलापूर जिल्ह्यातील १२ व धाराशिव जिल्ह्यातील ९ तक्रारी अशा एकूण २१ तक्रारींवर सुनावणी करण्यात आली. सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील प्रलंबित तक्रारीची सुनावनी बालहक्क आयोगाचे चैतन्य पुरंदरे, ॲड. जयश्री पालवे, ॲड. निलिमा चव्हाण हे सदस्य उपस्थित होते. तसेच आयोगाचे विधी सल्लागार प्रमोद बाडगी, माधवी भोसले शिक्षणाधिकारी वंदना जैन ,अवर सचिव व त्यांचे अधिकारी-कर्मचारी यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
सदर सुनावणी व आढावा बैठीत बालकांचा मोफत व सक्तीचा अधिनियम २००९, पोक्सो कायदा २०१२, बाल न्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ तसेच बाल हक्कांविषयक अन्य तक्रारी या अनुषंगाने सुनावनी संपन्न झाली, सुनावणीस शिक्षण विभाग, पोलिस विभाग, बांधकाम विभाग, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, बालकल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, अशासकीय संस्था, जिल्हास्तरीय चाईल्ड हेल्प लाईन, रेल्वे हेल्प डेस्क व अन्य विभाग प्राशासकीय विभागाचे सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक जिल्हा महिला बाल विकास अधिकारी रमेश काटकर यांनी केले