येस न्युज नेटवर्क : आरोग्य भरतीची परीक्षा आता राज्य सरकार पुन्हा घेणार आहे. त्याच्या तारखा लवकरात लवकर जाहीर केल्या जातील, अशी घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांशी याबाबत चर्चा झाल्याचं ही टोपेंनी सांगितलं. त्यामुळे आरोग्य भरतीच्या दोन्ही परीक्षा आता पुन्हा होणार हे आता स्पष्ट झालंय.
आरोग्य भरती संदर्भात विधानसभेत पोलिसांना सखोल चौकशी करण्यासादर्भत आदेश दिले होते. पोलिसांचा डिटेल अंतिम रिपोर्ट अत्यावश्यक आहे. ड वर्गाचा पेपर तो पूर्ण व्हायरल झाला होता त्यामुळे आम्ही पुन्हा ‘ड’ वर्गाची परीक्षा घेणार आहे. मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा केली त्यांचं ही मत लक्षात घेतलं आहे. दोन्ही परीक्षा लवकर घेण्याचा निर्णय घेण्याचा मंत्री मंडळाचा निर्णय आहे. त्याचबरोबर नामांकित संस्थांकडून परीक्षा घेण्याचा देखील निर्णय यामध्ये झाला आहे