सोलापूर-सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे आदेशानुसार आरोग्यअधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार शामानगर, अंगणवाडी क्रं.64 चिंतलवार वस्ती, 85 नं. गाळा, जयशंकर तालीम, महात्मा फुले झोपडपटटी येथे अनुक्रमे डॉ. वैशाली आगवणे, डॉ. शीतलकुमार चिलगुंडे, डॉ.राहूल नवले, डॉ. क्षिप्रा पिजंरकर आणि डॉ. वाळवेकर यांच्यासोबत ए.एन.एम. व संबधित आशाताई मिळून सदर भागामध्ये सर्वेक्षण करुन ताप, उलटी, जुलाब असणारे एकूण 167 रुग्णांची आरोग्य तपासणी करुन संशयित रुग्णांना औषधे देण्यात आली व त्यांचा मागोवा घेणेस आशाताई यांना सुचना दिले. त्याशिवाय राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 30 एम पी डब्ल्यू आणि मलेरिया विभागाकडील 12 एम पी डब्ल्यू यांनी कंटेनर सर्व्हे करुन, अबेटींग करताना ज्या कंटेनरमध्ये अळी दिसून आले ते कंटेनर रिकामे केले त्याचवेळी लोकांना अंडी, अळी यांचे डेंग्यू डासात रुपांतर होते ते सांगून पाणी ओतून त्यांना ते स्वच्छ करुन कोरडे करुन ठेवणेसाठी जनजागृती केली . तसेच पाणी उकळून घेणे तसेच पिण्याच्या पाण्यात तुरटी फिरवणे, वाटप केलेले मेडीक्लोर औषध पाणी आलेले दिवशी ते पिण्याच्या पाण्यात टाकण्यासंबधी माहिती देणेत आले.
यावेळी आशाताई यांनी 721 घरांचे सर्व्हेक्षण केले. तर मलेरिया विभागाकडील 11 टीम मिळून 3325 लोकसंख्येकरीता 721 घरामध्ये रिअबेटींग केले. तसेच एरियामध्ये अळीनाशक औषधाने स्प्रेईंग केले.प्रत्येक विभागात मा.आरोग्याधिकारी यांनी भेट देवून प्रत्यक्ष सर्व्हेक्षण, ओ.पी.डी, कंटेनर सर्व्हेसाठी सुचना वजा मार्गदर्शन केले. तसेच तेथील नागरिकांना वैयक्तीक स्वच्छते विषयी व बाहेरील थंड पाणी व बर्फजन्य खाद्यपदार्थ टाळणेसंबधी सूचना दिले. तसेच परिसर स्वच्छतेच्याही सूचना दिल्या. सोलापूर महानगरपालिकेतर्फे बाधीत क्षेत्रामध्ये लवकरच फिरता दवाखाना चालू करण्यात येत आहे.
