श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल विज्ञान व उद्योजकता महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दि. 19 डिसेंबर 2023 रोजी “समृद्ध गाव योजनेअंतर्गत” पडसाळी ता.उ.सोलापूर या ठिकाणी आरोग्य शिबीर संपन्न झाले. यासाठी लोकमंगल जीवनवेदा आयुर्वेदिक हाॅस्पिटलचे प्रमुख चिकित्सक डॉ सत्यजीत बाबर उपस्थित होते.
या वेळी गावातील 80 लोकांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. या शिबिरासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक प्रा समाधान कदम यांच्या मार्गदर्शनाखाली 20 विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून सहभाग नोंदविला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सतीशकुमार देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आरोग्य शिबीर संपन्न झाले.
यावेळी हाॅस्पिटलचे समाधान डावरे, मंगेश जमदाडे,स्वाती चिंदरकर, पांडुरंग भिसे यांनी सहायक म्हणून काम पाहिले.गावातील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी आरोग्य शिबीर आयोजित केल्याबद्दल संस्थेचे व महाविद्यालयाचे आभार व्यक्त केले.