सोलापूर : डॉ सुर्यप्रकाश राजेश कोठे यांच्या “स्व.विष्णुपंत कोठे मेमोरियल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि डॉ. कोठेज गॅस्ट्रो, लिव्हर केअर सेंटर सोलापूर “यांच्या वतीने स्व.विष्णुपंत ( तात्यासाहेब) कोठे यांच्या जयंतीनिमित्त पोलीस मुख्यालय येथे आरोग्य शिबिर संपन्न जेष्ठ नेते स्व. विष्णुपंत ( तात्यासाहेब ) कोठे यांच्या 88 व्या जयंतीचे औच्यित्य साधुन प्रसिद्ध गॅस्ट्रोएंट्रॉलॉजिस्ट डॉ. सूर्यप्रकाश राजेश कोठे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस मुख्यालय सोलापूर येथे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी एम. राजकुमार पोलीस( आयुक्त सोलापूर)यांच्या शुभहस्ते श्री विजय कबाडे( पो. उपायुक्त), गौर हसन (पो. उपायुक्त ) श्रीमती अश्विनी पाटील (पो. उपायुक्त ) सुधीर कराडकर ( सहाय्यक पोलीस उपायुक्त )डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्व विष्णुपंत ( तात्यासाहेब )कोठे स्व.महेश (अण्णा ) कोठे, स्व राजेश (अण्णा ) कोठे यांच्या प्रतिमांचे पूजन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक डॉ.सूर्यप्रकाश कोठे यांनी केले. स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या सामाजिक कार्याचा वसा पुढे नेत असताना सामाजिक स्वास्थ्य अबाधित राखण्यासाठी आपल्या कर्तव्याची पराकाष्ठा करणारे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या आरोग्यासाठी सामाजिक जाणिवेतून या शिबिराचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आयोजक डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचा शाल स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच विजय कबाडे गौर हसन, सुधीर कराडकर, अश्विनी पाटील आदी पोलीस अधिकाऱ्यांचा आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
त्याचबरोबर डॉ विठ्ठल धडके , डॉ अमजद सय्यद डॉ अभिजीत चिचोंळी डॉ लता पाटील डॉ श्रीकांत पाटणकर डॉ प्रभाकर होलीकट्टी डॉ दिगंबर गायकवाड डॉ अमृत बोल्ली डॉ कौस्तुभ कंदले डॉ दिनेश पडगीमल डॉ वेदीका पडगीमल संतोष चिवडशेट्टी आदी मान्यवर डॉक्टरांचा देखील सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांच्या कार्याचा वारसा कोठे परिवार मनापासून जपत असल्याचे तसेच डॉ सूर्यप्रकाश कोठे यांनी यावर्षी आमच्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे ने नेत्रपासणी एल एफ टी, ईसीजी,ब्लड चेकप,फॅब्रोस्कॅन, डायबेटीस या मोफत तपासण्या करून त्यांच्या आरोग्य विषयक समस्या जाणून घेतल्या याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर श्रीमती सुवासिनी ताई कोठे, श्रुती सूर्यप्रकाश कोठे, डॉ. राधिकाताई कोठे चिलका, मा नगरसेवक प्रथमेश दादा कोठे, श्रीनिवास चिलका, व्यंकटेश चिलका, विनायक कोंड्याल वासुदेव इप्पलपल्ली यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ अमजद सय्यद, डॉ विठ्ठल धडके यांनी देखील आपल्या मनोगतातून डॉ.सूर्यप्रकाश कोठे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. सौ राधिकाताई चिलका मॅडम यांनी केले. सदर शिबिरामध्ये पोट विकार नेत्र तपासणी,दंत तपासणी,स्त्री रोग तपासणी, हिपॅटायटिस बी हीपॅटायटीस सी, मधुमेह तपासणी, रक्त तपासणी फायब्रो स्कॅन इसीजी आदी तपासण्या करून मोफत औषधोपचार देण्यात आले. त्याचबरोबर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांचे मानसिक आरोग्य व आहार विहार याविषयी तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ४०० हुन अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेतला व शिबिराच्या आयोजनाबद्दल डॉ. सूर्यप्रकाश कोठे, कोठे परिवार व सर्व तज्ञ डॉक्टरांचे आभार व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश लामकाने यांनी केले.




