मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या अनेक महिला पैसे परत करण्याच्या तयारीत आहेत. एकट्या पुण्यातून जवळपास 75 हजार महिलानी पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हे पैसे परत घेण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून हेड तयार करण्यात आलाय. हे पैसे परत घेण्यासाठी आतापर्यंत हेड नव्हता त्यामुळे पैसे घेता येत नव्हते. मात्र आता ज्या अपात्र महिला लाभार्थी आहेत त्यांचे पैसे परत घेण्यासाठी हेड तयार करण्यात आला आहे. त्यामुळे ज्यांच्या घरी वाहन आहे किंवा इतर योजनांचा लाभ घेतला आहे, अशा अपात्र अनेक महिलांनी पैसे परत करायला सुरुवात केलीय. अपात्र असतानाही लाभ घेतल्याने कारवाई होऊ शकते, या भीतीने अनेक महिला पैसे परत करण्याच्या तयारीत आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या बाहेर पैसे परत करण्यासाठी रांगा लागल्या आहेत.
ज्या नियमात बसत नाहीत, अशा महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलंय. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतात किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण असलेल्या महिला लाडक्या अपात्र ठरवण्यात आल्या आहेत. अपात्र लाडक्या बहिणींना 28 जून 2024 व 3 जुलै 2024 रोजी देण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून वगळण्यात आले आहे.