सोलापूर : शांती नगर येथील येमुल वाडा येथे राहणारे सैफन इकबाल पठाण हे कुटुंबियांसह नळदुर्ग येथे देवाचे गंधक कार्यक्रमासाठी गेले असताना अज्ञात चोरट्याने मुख्य दरवाजा आणि हॉलच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील लोखंडी कपाटामधील सोन्याचे गंठण, सोन्याचे मणी मंगळसूत्र आणि सोन्याचे गलसरी असा ६० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची फिर्याद एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. ही चोरी पाच जुलै ते आठ जुलै दरम्यान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस हवालदार काळे अधिक तपास करीत आहेत .