येस न्युज मराठी नेटवर्क ; कल्याण नगर अक्कलकोट रोड येथील केदनाथ भागन्ना सोनटक्के हे आई-वडिलांकडे राहण्यासाठी गेले असताना अज्ञात चोरट्याने मुख्य दरवाजाचे कुलूप उचकटून आणि घरातील हॉलमधील कपाटाचे कुलूप तोडून ५०,६०० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. चोरीस गेलेल्या मालामध्ये २१,००० रुपयांचे कानातले टॉप्स, १८,००० रुपयांचे सोन्याचे फॅन्सी लटकन व एक जोड डोरले,६,००० रुपयांचे दोन ग्रॅमचे मुलाचे गळ्यातील फॅन्सी हार ६१ ग्रॅम वजनाचे चांदीचे पायातील पैंजण, तसेच इतर चांदीच्या वस्तू चोरीस गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस सब इन्स्पेक्टर माळी अधिक तपास करीत आहेत.