सोलापूर : किसान संकुल येथील घरातून १८ मे रोजी रात्री १० ते २५ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने ३,००० रुपयांची काळ्या रंगाची गिटार चोरल्याची तक्रार एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. अक्कलकोट रोड येथील गंगा रेसिडेन्सी येथे राहणाऱ्या मयुर पुकाळे यांनी चोरीची फिर्याद दिली आहे. मयूर पु काळे यांच्या मेव्हण्याने किसान संकुल येथील घर भाड्याने दिले होते. याप्रकरणी पोलीस हवालदार काळे अधिक तपास करीत आहेत.