सोलापूर — रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ आणि जिल्हा रुग्णालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मूकबधिर विद्यालय, दमाणी नगर येथे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यामध्ये जवळ जवळ 65 विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
या शिबिरामध्ये वजन, उंची तसेच रक्ताचे नमुने घेण्यात आले. हिमोग्लोबीन, थायरॉईड, शुगर, सिबिसी अशा अत्यावश्यक vividh चाचण्या करण्यात आल्या. शारीरिक दृष्ट्या मुल सुदृढ आणि आनंदी असेल तर त्याची प्रगती आणि विकास चांगला होतो. त्यामुळे आपोआपच देश ही सुदृढ बनतो. या मुख्य विचारानेच हे शिबिर आयोजित केले गेले.
प्रारंभी जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा समन्वयक सौ. स्मिता भोसले यांच्या शुभहस्ते फीत कापून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी रोटरी नॉर्थच्या अध्यक्षा डॉ जानवी माखिजा यांनी पुष्पगच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. तर त्यांचे सहकारी वडतीले आणि श्री अमर माने यांचा सत्कार शाळेचे सचिव सुनील दावडा यांनी पुष्पगुच्छ देऊन केला. मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे यांनी कार्यक्रमा दरम्यान शाळेची माहिती सांगितली. सर्व उपस्थितांचे आभार सचिव सुनील दावडा यांनी मानले, सूत्र संचालन सुप्रिया माने यांनी केले.
या कार्यक्रमास अध्यक्षा डॉ जानवी मखिजा, शाळेचे सचिव सुनील दावडा, बळीराम पावडे, विजया पिटाळकर, योगिता बोधले, गजानन गडगे, नागनाथ बसाटे, सोमनाथ ठाकर, दिनेश ताटे, अजित पाटील, आनंद पारेकार, विठ्ठल सातपुते, प्रद्युम्न माने, दीपक भोसले, गंगाधर मदभावी, साहेबगौडा पाटील, सोमनाथ थोरात, बाबासाहेब पवार, शबाना शेख, आदि उपस्थित होते.