डोसा अनेक लोकांचा आवडता खाद्यपदार्थ आहे. परंतु सोशल मीडियावर गेले काही दिवस व्हायरल होत असलेला ‘ दिलखुश डोसा’ पाहून अनेक खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटणे स्वाभाविक आहे . डोशामध्ये काजू, किस्मिस घातलेले आपण क्वचितच पाहीले असेल.
५६ सेकंदाच्या क्लिप मध्ये एक व्यक्ती दिलखुश डोसा तयार करताना दिसत आहे. सर्वप्रथम ही व्यक्ती तव्यावर बॅटर घालताना दिसते. त्यानंतर लोणी या बॅटरवर फिरताना दिसत आहे. त्यानंतर कांदा, कोबी , सिमला मिरची, खोबऱ्याची चटणी, पनीर ,काजू किसमिस, जिरा पावडर, गरम मसाला, मिरची हे सर्व एकत्र करून व्यवस्थितपणे शिजवताना दाखवले आहे . त्यानंतर धने पावडर , चीज आणि चेरी घातल्यानंतर हा डोसा सर्व्हिंग प्लेटमध्ये देताना दिसत आहे . हा डोशाचा प्रकार केवळ पाहूनच लोक खूष होत आहेत.