दुचाकीस्वार जखमी, मोटारीचा चालक पळाला
सोलापूर : पुणे हायवे वर राहुल हुंडाई शोरूम समोरून जात असताना दुचाकीला धडक मारणाऱ्या मोटारीमध्ये हातभट्टीची दारू सापडली आहे. ९ जून रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मोटरसायकल क्रमांक एम एच 13 के 5164 घेऊन जाणाऱ्या मल्लिनाथ हरसुले यांना एस्टीम कार क्रमांक एम एच 12 सी के 0434 च्या अनोळखी चालकाने धडक मारली तसेच बाजूस असलेल्या दुसर्या एका मोटर सायकलीस देखील धडक मारून चालकास गंभीर जखमी केले. याप्रकरणी रोहिणी मल्लिनाथ हरसुरे यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मल्लिनाथ हरसुरे हे सध्या स्पर्श हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत . एस्टीम मोटारीचा चालक अपघात झाल्यानंतर कार तेथेच ठेवून पळून गेल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. फौजदार चावडीचे पोलीस नाईक गवळी अधिक तपास करीत आहेत.