• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

पंढरपुरातील व्यापाऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन

by Yes News Marathi
August 11, 2021
in इतर घडामोडी
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : पंढरपूर शहरासह जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांमध्ये जिल्हा प्रशासनाने 13 ऑगस्टपासून संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात पंढरपूर व्यापारी महासंघाने जिल्हा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन सुरू केले . आज (बुधवारी) दुसऱ्या दिवशी व्यापारी महासंघाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात अर्धनग्न आंदोलन करून प्रशासनाच्या या भूमिकेचा निषेध केला आहे.

गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पंढरपूर शहर व तालुक्‍यात सतत लॉकडाउनमुळे नागरिक व व्यापारी वैतागले आहेत. मागील काही दिवसांपासून पंढरपूर शहरात सतत लॉकडाउन असल्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यातच आता प्रशासनाने 13 ऑगस्टपासून अनिश्‍चित काळासाठी संचारबंदी जाहीर केल्यामुळे व्यापाऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याचाच निषेध म्हणून व्यापाऱ्यांनी तीन दिवस आंदोलन पुकारले आहे. काल (मंगळवारी) घंटानाद आंदोलनाने निषेधाला सुरवात झाली. आज (बुधवारी) दुसऱ्या दिवशी सर्व व्यापाऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केले. उद्या (गुरुवारी) पंढरपूर प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. व्यापाऱ्यांच्या या आंदोलनाला सर्व पक्षांच्या नेत्यांनी पाठिंबा दिला आहे.संचारबंदीचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सत्यविजय मोहोळकर व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांनी दिला आहे. या वेळी रा. पा. कटेकर, किरण घाडगे, संतोष कवडे, सोमनाथ डोंबे, सचिन कारंडे, दत्ता लटके, कौस्तुभ गुंडेवार, अप्पा मुचलुंबे, श्री. कपडेकर आदींसह व्यापारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

Previous Post

सीमाभागातील मराठी बांधवांवर होणारा अन्याय थांबवा

Next Post

पक्षातले वरिष्ठ नेते जी जबाबदारी देतील ती सांभाळणार

Next Post
पक्षातले वरिष्ठ नेते जी जबाबदारी देतील ती सांभाळणार

पक्षातले वरिष्ठ नेते जी जबाबदारी देतील ती सांभाळणार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group