सोलापूर : येथील होमिओपॅथीचे तज्ञ डाॅ. सुनील वरळे यांना महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीच्या वतीने दिला जाणारा सन २०२२-२३ चा डाॅ.हॅनिमन जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती महाराष्ट्र परिषदेचे प्रशासक डाॅ.विलास हरपाळे यांनी पत्रकाद्वारे दिली.
लवकरच एका विशेष कार्यक्रमात मुंबई येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे. डाॅ. सुनील वरळे यांनी होमिओपॅथीच्या प्रसारासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रचार, प्रसार, शिक्षण व संशोधन या क्षेत्रामध्ये मोलाचे काम केले आहे. या योगदानाबद्दलच यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांचे सर्वथरातून अभिनंदन होत आहे.