श्रावण मास निमित्त कुमठे येथे 8 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर पर्यंत ह.भ.प. दत्तात्रय महाराज भोसले यांची शिवकथा अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाली. कथेच्या शेवटच्या दिवशी 108 बिल्व अर्चन पूजा झाली. गेली सात दिवस भगवान शंकराच्या जीवनातील अनेक प्रसंगाचं वर्णन , भोसले महाराज यांनी केले, श्री संत तुकाराम महाराज सांगतात की,
वाचे वदता शिवनाम l तया न बाधी क्रोधकाम ll
असं परम पावन चरीत्र भगवान शंकराचआहे,वारकऱ्यांच्या जीवनात पण हरी आणि हर यामध्ये काहीही भेद नाही असं तुकाराम महाराज सांगतात.

हरी हरा भेद l नाही नका करू वाद ll असे अनेक प्रमाण घेऊन भोसले महाराजांनी त्यांच्या वाणीने सात दिवस श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
या कथेचं आयोजन, समस्त कुमठे ग्रामस्थानी केलं होत. याप्रसंगी विशेष सहकार्य प्रकाश माने, मनोज कासार,महादेव महाराज , नीळ यांचं लाभलं.