पुणे : ज्ञानोबा, तुकोबांच्या पालखीचं पुण्यातून प्रस्थान झाले असून भक्तीमय वातावरणात पुणेकरांनी ज्ञानोबा, तुकोबांच्या पालखीला निरोप दिला. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या दोन्ही पालख्या पुण्यातून सासवडकडे जाण्यास मार्गस्थ झाल्या आहेत. तर पालखी विठोबा मंदिरातून ज्ञानेश्वर महाराजांच्या दोन दिवसाच्या विसाव्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांची पालखीही मार्गस्थ झाली आहे. दिवेघाटातील प्रवास सगळ्या कठीण असतो. याच कठीण प्रवासासाठी वारकरी मार्गस्थ झाले आहेत.