१५० पोती गुटखा, ७८ पावती सुगंधित तंबाखू जप्त
येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने कर्नाटक राज्यातून येणाऱ्या गुटख्यावर धडाकेबाज कारवाई करून सांगोला येथे ४३ लाख ९५ हजारांचा माल मंगळवारी २५ मे रोजी सकाळी सात वाजता जप्त केला आहे. जप्त केलेल्या मालामध्ये हिरा पान मसाला १५० पोती, रॉयल ७१७ सुगंधित तंबाखू ७८ पोती व एम एच 21X १९४७ हा ट्रक जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमित सिद पाटील यांचे नेतृत्वाखाली सांगोला येथे ही कारवाई करण्यात आली. ट्रक चालक व त्याच्या एका साथीदाराची ताब्यात घेण्यात आले. सांगोला पोलीस स्टेशन येथे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सविस्तर तपास चालू असल्याचे सोलापूर ग्रामीण च्या जनसंपर्क अधिकारी यांनी कळवले आहे.