सांगोला : भाजीपाल्याच्या वाहनांमधून नेण्यात येत असलेला 11 लाख 1 हजार रुपयांचा गुटखा व जीरा पान मसाला जप्त करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी सांगितले.
खबर मिळाल्या नुसार भाजीपाल्याची वाहतूक करणारा ट्रक थांबवण्यात आल्यानंतर भाजीपाल्याच्या क्रेट मागे 45 पोती आढळून आली. यामध्ये 30 पोत्यांमध्ये जीरा पान मसाला व 15 पोत्यांमध्ये गुटखा तंबाखू आढळून आल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास चालू आहे.