सोलापूर : पद्मशाली शिक्षण संस्था संचलित भू .म.पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. मानवी जीवनातील गुरुचे महत्त्व लक्षात घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. बाळकृष्ण गोटीपामुल होते. त्यांच्या शुभहस्ते महर्षी व्यास मुनींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
सोळा विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून गुरु विषयीचा आदर व्यक्त केला . गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व विद्यार्थिनींकडून शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. व सर्व वर्गातील वर्ग प्रतिनिधींचा सत्कार सर्व शिक्षकांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. कुमार सोलनकर यांनी केले. प्रा. मयुरा गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून गुरु पौर्णिमेचे महत्त्व सांगून विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.अध्यक्षीय समारोपा मध्ये उपप्राचार्य श्री.बाळकृष्ण गोटीपामुल यांनी आपल्या मनोगतात सांगितले की विद्यार्थ्यांच्या विकासात पालकांचा जेवढा वाटा असतो तितकाच वाटा शिक्षकांचा देखील असतो.ज्यांच्याकडून आपण विद्या प्राप्त करतो त्याचं विद्येच्या बळावर आपला विकास होत असतो .अशा या सद्गुरूंना मान देणे, कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री बिद्री ,रेणुका भंडारी, महेक पटेल या विद्यार्थिनींनी केले. तर आभार प्रदर्शन भोसले प्राजक्ता या विद्यार्थिनींने केले. या प्रसंगी सर्व विद्यार्थीनी, शिक्षक वृंद,तसेच शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.