सोलापूर : योगसाधना मंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. नंदकुमार कुवळेकर, साधना मंडळाचे रमेश तथा बाबुशेठ सोनी, श्रीमती मीनाताई देशपांडे देशपांडे आणि कार्याध्यक्ष नागनाथ पाटील आदी उपस्थित होते.
ओंकार पूजनाने कार्यक्रम साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी योग बंधू आणि भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर विद्या देशपांडे यांनी केले आणि आभार केशवभाई शहा यांनी मानले