येस न्युज नेटवर्क : केंद्रीय निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणूक होणार असून 1 आणि 5 डिसेंबर रोजी दिवशी मतदान होणार आहे. मतमोजणी 18 डिसेंबर रोजी होणार आहे. 4.9 कोटी मतदार गुजरातमधील नव्या सरकारसाठी मतदान करणार आहेत. 50 टक्के मतदान केंद्राचे थेट प्रसारण करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली. 51,782 मतदान केंद्र असून प्रत्येक बूथमध्ये सरासरी 948 मतदार आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी 3.24 लाख मतदार पहिल्यांदा मतदानाचा अधिकार बजावणार आहेत.
गुजरात निवडणुकीची वैशिष्ट्ये:
- कोरोनाबाधितांसाठी घरातून मतदान करण्याची व्यवस्था
- गिर जंगलात फक्त एका मतदारासाठी मतदान केंद्र असणार
- 9.87 मतदार 80 वर्षावरील मतदार
- 4.6 लाख युवा मतदार
- दिव्यांगांसाठी 182 विशेष मतदान केंद्र असणार
- गुजरातमध्ये 4 लाख 4 हजार दिव्यांग मतदार
- 142 आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले