येस न्युज मराठी नेटवर्क : पालकमंत्री दत्तात्रय भरणे उद्या 23 एप्रिल पासून तीन दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत . उद्या 23 रोजी माळशिरस, सांगोला ,पंढरपूर आणि मंगळवेढा 24 रोजी करमाळा ,बार्शी ,मोहोळ, माढा आणि 25 रोजी दक्षिण सोलापूर ,उत्तर सोलापूर आणि सोलापूर मनपा क्षेत्र असा पालकमंत्र्यांचा दौरा असणार आहे. जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन पालकमंत्री नवीन कोरोना रुग्णालये सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे.