सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपच्या 87 नव्या नगरसेवकांचा सत्कार पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते आज सायंकाळी सहा वाजता हॉटेल बालाजी सरोवर या ठिकाणी करण्यात येणार आहे. निमित्त सत्काराचे असले तरीही या माध्यमातून महापौर, स्थायी समिती सभापती, स्थायी समितीमधील सदस्य, तसेच स्वीकृत नगरसेवक याबाबत आता व्ह्यूव रचना आखली जाणार आहे . आजच्या बैठकीसाठी शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, आमदार सचिन कल्याणशेट्टी उपस्थित राहणार असल्याचे कळते. महापौर पदाचे आरक्षण येत्या दोन-तीन दिवसात शासनाकडून जाहीर होईल. त्यामुळे निवडून आल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे आता पुढचे नियोजन कसे करतात याची उत्सुकता शहरवासीयांना लागली आहे. स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी मात्र अनेकांनी आपापल्या नेत्यामार्फत जोरदार फील्डिंग लावली आहे.

