सातारा व पुणे जिल्ह्यातील सन्मानपत्र विभागीय आयुक्तांकडे..!
पालखी मार्गावरील उत्कृष्ठ काम
पंढरपूर – आषाढी यात्रा कालावधीत सर्व संताच्या पालखी मार्गावर व पंढरपूर शहरात भाविकांसाठी खास सुविधा देऊन उत्कृष्ठ काम केले बद्दल जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते गौरव करणेत आला. दरम्यान
पंढरपूर पंचायत समितीच्या प्रांगणात निर्मलदिंडी च्या समारोप समारंभात जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद व सिईओ कुलदीप जंगम यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करणेत आला. सातारा व पुणे जिल्ह्याचा सन्मान पत्र विभागीय आयुक्त म्हणून डाॅ. चंद्रकांत पुंडकुलवार यांचे कडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते सुपूर्द करणेत आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम विकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे हे होते. यावेळी कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, मंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, विभागीय आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुंडकुलवार, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजित पाटील, आमदार सचिन कल्याणशेट्टी,आमदार देंवेद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवाडे, उप सचिव डाॅ. पदमश्री बायनाडे , सचिव अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन ) स्मिता पाटील, महिला बाल कल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकिले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता ) अमोल जाधव, प्रणव परिचारक, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी,गट विकास अधिकारी सुशिल संसारे, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज राऊत मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करणे साठी कनिष्ठ प्रशासन अधिकारी सचिन सोनकंबळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, अधिक्षक अविनाश गोडसे, झेड ए शेख, अधिक्षक शहानवाज तांबोळी , संवाद सल्लागार सचिन सोनवणे, क्षमता बांधणी समन्वयक शंकर बंडगर, सनियंत्रण सल्लागार यशवंती धत्तुरे, वित्त व संपादणूक सल्लागार अर्चना कणकी, क्षमता बांधणी सल्लागार महादेव शिंदे, सांडपाणी सल्लागार प्रशांत दबडे, अल्फीया बिराजदार, सुजाता साबळे, तेजस्विनी साबळे, आनंद मोची, रत्नदीप फडतरे यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन ऐश्वर्या हिब्बारे यांनी केले तर प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे यांनी आभार मानले.
सचिन कल्याणशेट्टी यांचा पुढाकार अन पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सन्मान..!
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मुख्यमंत्री यांना बोलून ग्रामविकास मंत्री व पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे मार्गदर्शना खाली प्रशासनातील अधिकारी यांनी चांगले काम केलेचे निदर्शनास आणून दिले नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत हून पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा वारकरी फेटा, उपरणे घालून सन्मान केला. पालकमंत्री गोरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवत जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद व सिईओ कुलदीप जंगम यांचा सन्मान करणेची विनंती मुख्यमंत्री यांचे कजे केली. पालकमंत्री गोरे यांनी हे काम सफाई कर्मचारी यांचे पासून विभागीय आयुक्त यांचे पर्यंत सर्वानी परिश्रम घेतले आहेत असे सांगून श्रेय सर्वाना देऊन टाकले.