सोलापूर – आज गुरुवार दिनांक११/०९/२०२५ रोजी जनकल्याण मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि;सोलापूर शाखा तडवळचा ४ था वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला. वर्धापन दिनानिमित्त तडवळ शाखेच्या नियोजित वास्तूचे भूमिपूजन व फलकाचे अनावरण माननीय श्री.ष.ब्र.१०८ गुरुशांतलिंग शिवाचार्य महाराज संस्थान हिरेमठ कलहिप्परगी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
वर्धापन दिनानिमित्त वाहन वितरण,ग्राहक मेळावा,आदर्श शिक्षक पुरस्कार व ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळ्याचे तडवळ येथील भाग्यवंती मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री.गुरुशांतलिंग शिवाचार्य महाराज व व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलाने करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्तविक संस्थापक चेअरमन माननीय राजेंद्र हजारे यांनी केले. आपल्या प्रास्तविकात त्यांनी संस्थेच्या मागील तेरा वर्षातील वाटचालीचे व प्रगतीची माहिती उपस्थितांना दिली.यावेळी त्यांनी सदर कार्यक्रमासाठी लक्षणीय उपस्थितीबद्दल महिलांचे आभार मानले. प्रास्ताविकानंतर तडवळ परिसरातील आदर्श शिक्षकांचा मानचिन्ह,ज्येष्ठ नागरिकांचा नॅपकिन बुके देऊन सत्कार करण्यात आला.तसेच वाहन कर्ज घेतलेल्या कर्जदारांना प्रतिकात्मक स्वरूपात वाहनाची चावी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाच्या समारोप भाषणात जनकल्याण मल्टीस्टेटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशा हजारे यांनी संस्थेने महिला सक्षमीकरण, ग्राहक,सभासद , ठेवीदार, शेतकरी यांच्यासाठी राबवलेल्या विविध योजनांची व मागील तीन वर्षात सभासदांना सर्वोत्तम लाभांश दिल्याची माहिती उपस्थितांना दिली.
या कार्यक्रमासाठी जनकल्याण मल्टीस्टेटचे संचालक नितीन कुलकर्णी, पंडित बुळगुंडे व तडवळ गावाच्या परिसरातील प्रतिष्ठित नागरिक सुरेश गड्डी, रामचंद्र अरवत, शिवनिंगप्पा अरवत,संतोष कुंभार,सुरेश झळकी,प्रकाश पाटील, शिवसिद्ध बुळा, श्रीकांत पवार,श्रीशैल करजगी,काशिनाथ तद्देवाडी, रेवणसिद्ध शेडजाळे,हणमंत तद्देवाडी,शिवानंद सद्दलगी,महादेव मुडवे,सैपनमूलूक पटेल,संगु पाटील उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन संस्थेचे जनसंपर्क अधिकारी सचिन भोसले यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तडवळ शाखेचे शाखाधिकारी बसय्या मठपती यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.